नागपूर | पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले होते तसेच उत्तरप्रदेश आणि गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपने आपली सतत स्थाहपण केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.
गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे या विजयानंतर मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आणि तेथेही त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळापासून एक रॅलीही काढण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत एक भाकित वर्तवलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं, हा सत्कार मी स्वीकारतोय. मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात स्वीकारतोय. खरं श्रेय त्यांचं आहे. जी काही संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न केला. मोदीजींच्या बाबत जे काही सकारात्मकता, विश्वास आहे त्याचा हा विजय आहे. आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.