मी गौप्यस्फोट करणार हे या सरकारला ठाऊक आहे म्हणून हे सरकार पळ काढत आहे’, असा आरोप राज्यचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला होता. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर शरद पवारांनी यावेळी फडणवीसांना एक सल्लाही दिला आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांना जे काही गौप्यस्फोट करायचे आहेत ते त्यांनी खुशाल करावेत. महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे. त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा. त्यासाठी राज्याला वेठीला धरू नका. राज्यात कोरोनाची स्थिती आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला आहे. केंद्राने जे संसदेच्या अधिवेशनाबाबत केलं ती परिस्थितीही लक्षात घ्या असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.
तसेच OBC आरक्षणासाठी भाजपने केलेली आंदोलनावर बोलताना टोला लगावत शरद पवार म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत की आंदोलन करू नका, आंदोलनांपासून लांब राहा आणि राज्यातले त्यांचेच भक्त आता आंदोलन करणार आहेत. असा टोला पवारांनी भाजपाला लगावला होता.