गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी गाडीवर काही व्यक्तींनी हल्ला केला. यात पडळकरांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र गाडीच्या काचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
संध्याकाळी पडळकर सोलापुरातील मड्डी वस्ती भागात घोंगडी बैठक घेण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीनं पडळकरांच्या गाडीवर दगडानं हल्ला केला. या हल्यानंतर पाडळकरांनी थेट राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती तसेच राष्ट्र्वादीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सुद्धा लगावला होता. आता त्यांच्या या टिकेवरून आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना टोला लगावला आहे.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या घोंगडी बैठका चालू आहेत. माझी इथे कुणाशी ओळख नाही कुणाशी दुश्मनी नाही.. मग हा हल्ला कुणी केला याचं उत्तर साऱ्या जनतेला माहीत आहे , असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तर पडळकर यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.
या घटनेनंतर पडळकर म्हणाले की, घोंगडी बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा ४ ते ५ लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल.