दोन दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. याचं मुद्दयावरून राज्यातील वातावरण चन्गलेच तापू लागले होते. पाडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीच्या टिकेवरून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. या हल्यात त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आले होती.
मात्र पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तीन दिवसांपासून दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. त्यांना लवकर पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथुन शनिवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे.
अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. तसेच त्याने दगडफेकी सारखे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले आहे का, याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.
कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारी व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होती, हे कशावरुन? काही लोक स्वत:हून गाडीवर दगडफेक करुन घेतात, अशी शंका अजित पवार यांनी बोलून दाखविली होती.