सध्या संपूर्ण देशभसरात कोरोना सर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे . आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे, आज कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशातील वैज्ञानिक संशोधन करत आहे. मात्र त्यातच आता मोदी सरकारने नवा दावा केला आहे. ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये सध्या एक संशोधन करण्यात येत आहे.
या संशोधनानुसार कोरोना रुग्णांवर सामान्य उपचारांव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप आणि प्राणायम केल्याने काही सकारात्मक प्रभाव पडतो का?, याबाबत सध्या संशोधन सुरु आहे. या संशोधनासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. सध्या गायत्री मंत्राच्या संशोधनासाठी २० रुग्णांवर अभ्यास केला जात आहे. १४ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या चाचणीमध्ये रुग्णांच्या शरिरामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी केली जाणार आहे.
सध्या या प्रयोगासाठी म्हणून क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठीची अधिकृत नोंदणीसुद्धा आयसीएमकडे करण्यात आली आहे. 20 रुग्णांना दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे. पहिल्या गटातील लोक सामान्य उपचारांसह सकाळी आणि संध्याकाळी प्राणायमाशिवाय गायत्री मंत्राचंही पठण करणार आहेत. तर दुसऱ्या समूहातील लोकांना कोरोनातून वाचण्यासाठी फक्त सामान्य उपचार दिले जात आहेत. या दोन्ही समूहातील रुग्णांच्या शरीरातील बदलांसाठी 14 दिवसांपर्यंत अभ्यास केला जाईल, आणि त्यावर निष्कर्ष काढले जाणार आहेत.