मुंबई | पॉर्न चित्रपट बनावट असल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती आणि उदयॊगपती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता,मात्र शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायांत कुंद्राची भागीदार आहे.
कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिचीदेखील पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. पोलिसांनी शिल्पाला पोलीस ठाण्यात बोलावले नव्हते, परंतु शुक्रवारी गुन्हे शाखेची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी यावेळी राज कुंद्रालाही सोबत नेले होते आणि सुमारे ६ तास कुंद्रा आणि शिल्पाला एकत्र बसून चौकशी केली गेली.
राज कुंद्राचे ऍडल्ट ऍप हॉटशॉट्स आणि त्यातील कटेंटविषयीची पूर्ण माहिती शिल्पाला होती. या ऍपमधून होणाऱ्या कमाईमधील मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती असे मानले जाते आहे. त्यामुळे शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे.