मुंबई | महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे शाब्दिक युद्ध काही दिवसांपासून राज्यात पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परखड शब्दांत सुनावल्यानंतर कॉंग्रेसकडून नमते घेतल्याचे संकेत मिळाले आहेत.
. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असे म्हटले आहे. या आधीचे सरकार ५ वर्ष चालले, त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालत होते तरी ते सरकार चालले. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत.
मात्र आम्ही आघाडीमध्ये आम्ही कायमस्वरूपी आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता. उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. मी त्या दोघांची भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. त्यामुळे आज आम्ही म्हणतो की, त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे”, असे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.