भारतीय जनता पंखाचे नेते आणि मंत्री सतत आपल्या वध्रस्ट विधानामुळे आणि वर्तणुकीमुळे सतत चर्चेत असतात. आता भाजपच्या एका नेत्यांवर आपल्याच पक्षातील नेत्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लागावण्यात आला आहे. सदर अपहरण झालेली मुलगी ८ महिन्यांनंतर गरोदर अवस्थेत सापडली आहे. ती अल्पवयीन मुलगी भाजपच्याच दुसऱ्या नेत्याच्या ताब्यात होती.
मंगळवारी बेपत्ता मुलीचा शोध लागला. मोरादाबादमधून पोलिसांनी तिची सुटका केली. भाजपच्याच एका नेत्यानं तिला बंदीवासात ठेवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. दोन्ही भाजपचे नेते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मुलीला स्वत:च्या ताब्यात ठेवणारा विष्णू शर्मा भाजपचा बूथ अध्यक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्यानं स्वत:चा मुक्काम बदलत होता. आरोपीला अटक झाल्यानंतर बेपत्ता मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे.
आठवीत शिकणारी मुलगी जानेवारीत तिच्या आजी आजोबांच्या घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर शर्माचा ठावठिकाणादेखील सापडत नव्हता. त्यामुळे हरवलेल्या मुलीच्या वडिलांना शर्माबद्दल संशय होता. त्यांनी त्यांच्या तक्रारीत शर्माचा उल्लेख केला होता. जुलैमध्ये पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी पाच पथकं तयार केली. प्रकरणाचा तपास संभलच्या गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला