मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशी माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे माहिती दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांना ट्रेस केलं जात आहे. जे मुंबईत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे. मुंबईच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय, कोविड सेंटरची तयारी करण्यास सांगितलं आहे. १०२ टक्के लसीकरण पहिला डोस पूर्ण, ७२ टक्के दुसरा डोस पूर्ण झाले आहेत. लसिकरणाच्या वेगासाठी दोन डोसमधील अंतर कमी करणं गरजेचं आहे, तशी विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे
तसेच आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाहीय. पण काळजी घेणं गरजेचं आहे. शाळा आपण सुरु करत आहोत. पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे.