कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.
मात्र तरीही किल्ल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आज पहाटोपासून ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणांनी आसमंत निनादून निघाला आहे. किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसंच इतरही महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असून शिवनेरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले.
मात्र शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाईवरून राज्यसभा खा. संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.