राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र लॉकडाऊन नंतर आलेल्या बिलांच्या आकड्यांमुळे अनेकांना घाम फुटला होता. या आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलाविरोधात तसेच भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने लावलेला तगादा या विरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन पुरकरण्यात आले होते, या आंदोलनात विविध पक्षांनी पुढाकार घेऊन मोर्चे काढले होते. मात्र अद्याप यातून नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
त्यात आता आलेल्या भरमसाठ बिलाच्या विरोधात तसेच करण्यात येणाऱ्या सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन छेडणार आहे. याची माहिती स्वीभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. तसेच सरकारकडून अचानक सक्ती केली जात आहे. मात्र सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
यावं साह्ये बोलताना शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. १९ मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
तसेच सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असेही राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.