नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. देशात तीन कृषी कायदे लागू केल्यामुळे शेतकरी कृषी कायद्यांविरोधात मागील वर्षभरापासून आंदोलन करत असून आता या आंदोलनाला यश आले आहे. या आंदोलनादरम्यान ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अखेर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
मोदी सरकारने मानवतेच्या आधारावर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे एका वृत्तवाहीने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. तीन कृषी कायद्यांना आधीच स्थगिती देण्यात आली होती. कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करत होते. विरोधकांनी त्यांची दिशाभूल करु नये यासाठी केंद्राने हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, असा दावा सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी केला आहे.
मानवतेच्या आधारे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात अल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये. शेतकऱ्यांनी आपल्या घरी जावं, या हेतूनं कृषी कायदे रद्द केले आहेत. एमएसपी आणि इतर अनुदानाबद्दल निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी वेळ लागेल. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांनी विरोधी पक्षांच्या प्रचाराला बळी पडू नये, असे सरकारला वाटतं.