एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घुसल्यामुळे वाद पेटला आहे. त्यातच आता या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी परवाहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.
तसेच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही. शिवसेनेची एसटीमध्ये कामगार संघटना आहे, त्यांनीही का बोलले नाही. उगाच, भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.
तसेच, विलिनीकरणाला वेळ लागणार आहे, मग एक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो, एक आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी मुंबईतच हे अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असेही राणे म्हणाले.