मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे गडद संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हे अधिवेशन होणार की नाही याबाबत ठाकरे सरकारकडून शंका व्यक्त केली जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकार कोरोनाचे कारण पुढे करून विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचे फडणवीसांनी सांगितलं आहे. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवाल नाव न घेता संजय राठोड प्रकरणावर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच “मंत्री 10 हजार लोकं जमवतात आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवतात” असा टोला सुदधा त्यांनी लगावला आहे.