सातारा | अभिनेते किरण माने मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आले होते. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यांनतर किरण माने सतत सोशल मीडियावर आपली बाजू मांडत असतात.दरम्यान किरण मानेंच्या एका इन्स्टा पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूया काय आहे ही नेमकी पोस्ट. अभिनेते किरण माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
ही पोस्ट माजी खासदार निवेदिता माने यांच्याबाबतीत आहे. किरण माने यांनी निवेदिता माने यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांनी पोस्ट करत लिहिलं आहे, ””किरणजी, आठवड्यापूर्वी पट्टणकोडोलीला एका कार्यक्रमाला गेले होते. बचत गटाच्या दोन हजार महिला तुमच्यासाठी हळहळताना पाहिल्या…
मला सांगत होत्या किरण मानेंवर अन्याय झालाय, प्लीज त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी करा. मराठी कलाकारासाठी एवढं प्रेम मी याआधी पाहिलं नव्हतं. तुम्हीच जिंकणार.” इचलकरंजीमधून सलग दोन टर्म खासदार झालेल्या मा. निवेदिता माने मॅडम मला सांगत होत्या.
हल्ली त्यांचा मुलगा धैर्यशील खासदार आहे….सांगलीजवळील उदगांवमधील नागरीकांनी त्यांच्या हस्ते माझ्या लढ्याला सन्मानित केलं आज. उद्या बोलू त्याविषयी”.या पोस्टमुळे किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते.