उत्तरप्रदेश विधानसबनिवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच काँग्रेससह समाजवादी पक्षाने सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी जोरदार रणनीती आखली आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसने उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने एनआरसीच्या वेळी यूपीमध्ये चकमकीच्या नावाखाली कितीतरी लोकांना मारले. इतिहास बदलण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने शहीद ज्योती नष्ट केल्या. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहील, आज भाजप त्याच्याशी खेळत आहे. आज सकाळी ब्राह्मण समाजातील लोक मला भेटायला आले होते. तुम्ही आल्यावर आम्ही अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे त्यांनी सांगितल्याचे ममता म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात, आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांना ठेचून मारले. यासाठी भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, यूपीमध्ये कोविडमध्ये लोक मरत होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री योगी कुठे होता? ज्यांचे मृतदेह तुम्ही गंगेत टाकायला भाग पाडले त्या लोकांच्या कुटुंबीयांची माफी मागा. पीएम मोदी म्हणतात, आम्ही यूपीला पैसे दिले. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिलेत का? हा सर्व पैसा जनतेचा आहे, असंही त्या म्हणाल्या.