मुंबई | पर्यावरन मंत्री आदित्य ठाकरे यांनी २०२७ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, असं आश्वासन मुंबईकरांना दिलं आहे. राज्याच्या पर्यावरणावर बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जगभरात पर्यावरणाच्या बाबतीत राज्य सरकारांमध्ये सर्वाधिक चांगले काम महाराष्ट्राने केले आहे. प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षातील नैसर्गिक आपत्ती ही वातावरणीय बदलामुळे आली आहेत. एनर्जी व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील प्रदूषण कमी करावे लागेल. जिथं दुष्काळ होता, तिथं आता अतिवृष्टी होताना दिसतेय. पश्चिम किनारपट्टीवर कधी वादळे येत नसते, पण वर्षभरात दोन ते तीन वादळे येवून गेली आहेत. ऋतू बदलत आहेत, तसं आपल्यालाही बदलावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणले की, २५० मिमी पाऊस एका दिवसात पडला तर कुठलंही शहर हे सोसू शकणार नाही. मनुष्य स्वत:ला ताकदवान समजतोय. पण डायनासोरही पूर्वी ताकदवान होताच की. पण निसर्गापुढं तोही लूप्त झाला. त्यामुळं डायनासोर व्हायचं नसेल तर बदलायला हवे, असेही आदित्य म्हणाले.