जळगाव | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज सकाळी ११ वाजता ईडीने खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी कार्यलयात हजर झालेले असताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता.
गेल्या ८ दिवसांपासून जळगावमध्ये कुछ होने वाला है असा मेसेज फिरत होता. याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतूने हे सर्व सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज सकाळी ११ वाजता ईडीने खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानं खडसेंची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यामुळं ते चौकशीसाठी हजर राहणार का?, याबाबत शंका असतानाच खडसे चौकशसाठी ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.