भंडारा जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे १० नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला होता हे प्रकरण ताजे असताना आता मुंबईत मॉलमध्ये असलेल्या रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये १२ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घडलेल्या घटनेची गंभीर दखली असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. सदर रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत होते. ६७ रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली.तर ९ रुग्णांवर मृत्यू ओढवला.
सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले…ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं, अशी टीका भाजपाने ट्विटरद्वारे केली आहे.
मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ३१ मार्च २०२१पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्याने हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले आहे.