(मुंबई प्रतिनिधी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीच्या दर्शनासाठी सहकुटुंब पोहचलेले असताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी केली होती. एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडली होती.
त्यात पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्या गर्दीबाबत आक्षेप नोंदवला होती. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसने ही नाराजीचा सूर ओढल्यामुळे शिवसेनेची एकप्रकारे कोंडी झाली होती.
पोहरादेवी गडावर करोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे तसेच, संपूर्ण प्रशासन करोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना राज्यातील एक मंत्री अशी गर्दी जमवत असेल तर ते सरकारच्या प्रतिमेला शोभत नाही. यामुळे पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.