औरंगाबाद | ‘घरकुल नाही फेककुल’, ‘सपनो का घर सपने में ही मिलेगा’ अशा आशयाचे बॅनर औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने लावण्यात आले असून या बँनरमुळे आता औरंगाबादमध्ये एमआयएम णिभाजपामध्ये वाद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान घरकुल योजनेबाबत मोठ्या प्रमाणावर टीका केली होती.
जलील म्हणाले की, पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपनो मे ही मिलेगा’ अशी टिका त्यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर केली होती. मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असुन केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता व कार्यपध्दतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केले होते.
या पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनेवर घणाघाती टीका केली होती. यात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचे जाहीर करुन कोटयावधी रुपयांचे होर्डिंग व जाहीराती लावून शासकीय पैशांचा गैरवापर करुन सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.