मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआयने चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.
त्यामुळे राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नाव आघाडीवर होते. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत होते.
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यरपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.