विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. मात्र, वाढदिवसाला कुणीही जाहिरातबाजी आणि होर्डिंगबाजी न करता समाज हिताचे कार्यक्रम घेण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत माजी महापौर भाजप नेते संदिप जोशी यांच्या नेतृत्त्वात नागपूरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
आज सकाळपासून आरोग्य शिबीर, कोरोनात पती गमावलेल्या निराधार महिलेला ई – रिक्षा वाटप, २०० कुटुंबांना हेल्थकार्डचे वाटप, दिनदयाळ थालीचे निःशुल्क वाटप, आरोग्य शिबीर, कोरोनात वडील गेलेल्या मुलांना सायकल वाटप करण्यात आले.
नागपुरात कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अनेक परिवार रस्त्यावर आले आहे. त्यांना आधार देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याच कार्यक्रमात वृषाली उके या दिव्यांग महिलेला ई रिक्षा देण्यात आला आहे. कोरोनात पती गमावल्यानंतर कुटुंब चालवण्यासाठी याची मोठी मदत होईल, असं म्हणते वृषाली उके यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहे.