मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस असल्याची टीका गोटे यांनी केली आहे. जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात मास लीडर संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा घणाघात गोटे यांनी केलाय.
अनिल गोटे आज मुंबई पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांचा चांगलाच संचार घेतला होता. तसेच चंद्रकांत पाटील हे काही मास लीडर नाहीत. त्यांच्या बोलण्यानं सत्य लपत नाही. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आळ्याचा दावा गोटे यांनी केला आहे.
त्यातच प्रमाणे आघाडीमध्ये सुरु असलेल्या अंतर्गद वादविवादावर गोटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. त्याचबरोबर सत्ताचूर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो? असा टोला गोटे यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.