आरएसएसची सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमधील मडियाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.धमक्या देणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना मोठी असून आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ असंही त्यांनी पोलिसांनी जाहीर केलं आहे.
लखनौ सोडून अन्य ठिकाणी सोमवारी रात्री 8 च्या सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इतर पाच कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये धमक्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय.
देशात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढल्यापासून अशी प्रकरणं अधिक उजेडात येत आहेत. त्या ग्रुपमधील चर्चा करणारे सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकरण उजेडात येईल. कारण आत्तापर्यंत अशा प्रकरणामधून सीसीअस असं काही बाहेर आलेलं नाही. रात्री अचानक असे मॅसेज प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांची भंबेरी उडाली. तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देशात अनेक ठिकाणी आरएसएसची कार्यालये आहेत.