पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यात पंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी थेट तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदी-शहा टीकेला ममता दीदींनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
दक्षिण दिनाजपूर येथे निवडणूक सभेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर आणि मोदींवर जोरदार टीका केली होती. मी खेळाडू नाहीय, मात्र खेळ करा खेळायचा हे मला चांगले ठावूक आहे. याआधी मी लोकसभेतील सर्वोत्तम खेळाडू होते, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांसमोर आत्मसमर्पण करणार नाही, असे म्हटले. ममता बॅनर्जी यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्याकडेच होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यापासून बंगालमध्ये मुक्काम ठोकून आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भ्रष्टाचार, विकास आणि हिंसाचार या मुद्द्यावरून घेरत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी या पायाला प्लॅस्टर बांधून व्हिलचेअरवर बसून निवडणूक सभा घेत आहेत.