मुंबई | ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय घ्या असे विधान भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते.
आता त्यांच्या या विधानाचा काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. सुनील केदार म्हणाले की, ‘राजकारणासाठी, मतांसाठी राजकारण जरूर करा. पण सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नांवर बोलताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने अत्यंत केविलवाणे वक्तव्य करावे हे दुर्दैवी आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना महाराष्ट्र मुक्त करण्यात आले हे काय कमी आहे का?’ असा टोलाही यावेळी सुनील केदार यांनी भाजपला लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या औरंगाबाद येथे पंकजा मुंडे : ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय घ्या असे विधान पंकजा मुंडे यांनी केले होते.