राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत महाविकास आघाडी सरकारमधील मंंत्री व नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यांनि नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचारावरून आरोप केला. त्यांच्या आरोपांना पवारांनी उत्तर दिले आहे.
पवार म्हणाले की, ‘पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तसेच या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता असे पवार यांनी उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे कोरोना परिस्थितीबाबत यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीवेळी येथील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीवेळी भ्रष्टाचार झाला आहे का अशी विचारणा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झाले आहे, असे सांगितले.