भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट यांना आज कराड येथी रेल्वे स्थानकावर महालक्ष्मी ट्रेनमधून उतरवण्यात आले होते. यावर आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे. कऱ्हाडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती आरोप लगावले आहेत.
मात्र कराड स्थानकावर सोमय्या यांच्यावर ठाकरे सरकारच्या दडपशाहीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईवर सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र या कारवाईवर आता खुद्द शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमैय्यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात, संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर, किरीट सोमय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते. त्यानुसारच, गृहमंत्रालयाने किरीट सोमैय्यांवर कारवाई केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.