काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर स्वरूपाची आरोप लगावले होते. या आरोपांचे पडसाद आता उमटू लागले असून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.
आज किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आले होते. यावेळी भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली. यावर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली.
याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या. यावर आता किरीट सोमय्या यांनी अशा धमक्यांना मी भीत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.