राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस सध्या राज्यातील कोराना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशातच कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर शहरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत राऊतांनी याबाबत माहिती दिली.
नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर शहरातील नागिरकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नसल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली त्यासोबतच नागपूर शहरातील कोरोनो परिस्थितीचीही माहिती दिली तर लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार आहेत तर शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थितीला परवानगी असणार आहे. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा आणि मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहणार असल्याचं नितीन राऊतांनी सांगितलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकानं सुरु राहतील तर डोळ्यांचे दवाखानेही सुरु राहणार आहेत. तर घरी विलगीकरणात असणाऱ्या रूग्णांनी घरातच थांबायचं आहे. या रूग्णांनी प्रशासन अचानक भेट दिली जाणार आहे यामध्ये अचानक जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई होणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.