अवघ्या काही दिवसांवर आलेली एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विध्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून या निर्णयाचा निषेध करत आहेत.
एमपीएससी परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र अचानक सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
पुण्यात एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला,यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विध्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध कारक्तर घोषणाबाजी केली होती.
यावर आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा एमपीएससी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रास्तावरून हटणार नाही ,गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या ,मग एमपीएससी परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारच राजकारण काय?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच पुण्यात १ लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएसी’ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे.