काही दिवसांपूर्वी केंद्र नव्या सहकार खात्यांची निर्मिती करण्यात आली असून या खात्यावर गृहणमंत्री अमित शहा त्यांची नेमणूक करण्यात आलीय होती. मात्र केंद्राच्या या निर्णयाद्वारे राज्यातील सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप लागावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र लेचपेचं नाही की कुणीही आलं आणि मोडून काढलं असं म्हणत मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना टोला लगावलाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. एवढंच नाही तर गुलाबराव पाटील यांच्याबाबत बोलताना मुख्मयंत्री उद्धव ठाकरे असंही म्हणाले की ‘गुलाबराव असं म्हणाले होते की दिल्लीत जाऊन बसण्यापेक्षा मी महाराष्ट्र उभा करेन.’ हाच संदर्भ देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘काही लोक दिल्लीत जाऊन नुसतेच उभे राहतात त्यांना साधं बसायलाही मिळत नाही’ असं म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्याआधी सहकार खातं नव्याने तयार करण्यात आलं आणि त्याची धुरा अमित शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली. ज्यानंतर यावरून विरोधक आक्रमक झाले. सहकार मंत्रालय स्थापन करून आणि ते अमित शाह यांच्याकडे देऊन भाजपला महाराष्ट्र आणि गुजरात येथील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवायचं आहे असा आरोप विरोधकांनी केला गेला होता.