मुंबई | – मालाड येथे क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद रंगला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले.
त्यातच भाजपानेही टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. या वादावर आमदारअमित साटम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
“मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या महापौर किशोरीताई पेडणेकर एका बाजुला जाहीर करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे.
तसेच दुसऱ्या बाजुला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटी बनावटी दस्ताऐवज वापताहेत. वास्तविक जर टिपू सुलतान नामफलक अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यतच त्या मग्न आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व इतर कामांसाठी फेर फार क्रमांक ९०३ प्रमाणे महसूल पत्रकात नोंदवलेली आहे.
पालकमंत्री मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करून क्रिडांगण बांधताहेत. म्हणजे अवैध वापर करताहेत. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरीता गैरवापर करताहेत. आपणास नम्र विनंती आहे की यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे ही विनंती असे पात्रत नमूद केले आहे