राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी एकत्र येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र येणार आहे. तर देहूतील कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे गैरहजर राहणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहे. मुंबईत दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा राजभवन इथं पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांनी शिवसेनेला शह दिला होता. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे, याआधी एप्रिल महिन्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर प्रदान करण्यात आला होता.