गोवा | भाजपाची सत्ता असलेला गोवा राज्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असुरक्षीत बनविले असल्याची टिका आप गोवा महिला विंग उपाध्यक्ष सुषमा गौडे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष न्यायालये आणि सीसीटीव्ही उपकरणांसारख्या ठोस उपाययोजनांची मागणीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली होती
‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमुळे गोव्यातील धक्कादायक बाजू समोर आली. गोव्यातील बलात्काराचे प्रमाण मागच्या काही वर्हस्त ७.८ टक्के आहे. हा आकडा राष्ट्रीय दर ४.३ च्या दुप्पट आहे. गोव्यात मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणे आहेत. महिलांवरील हिंसाचारासंबंधीची ९५.७ टक्के प्रकरणे प्रलंबित आहे.
तसेच राज्य महिला आयोगही निष्क्रिय असून कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा झोपली आहे का? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या महिला विंगने उपस्थित केला. सिद्धी नाईक प्रकरणामुळे राज्यातील सीसीटीव्ही निष्क्रिय असल्याचे सिद्ध होत असून, महिलांच्या सुक्षेच्याच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचे गौडे म्हणाल्या.