मुंबई प्रतिनिधी : अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी तसेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे आणि शिवसेना संबंधावर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकवेळा भाष्य केले होते. आता पुन्हा एकदा राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या रश्मी शुक्ल फोन टॅपिंग प्रकरण गाजत असताना या प्रकरणावर मुख्यमंत्री ठाकर एयानी कोणतेही विधान केलेले नाही हाच धागा पकडून राणे यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहे.
राणे म्हणाले की, फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे हा नंतरचा भाग आहे. पण त्या फोन टॅपिंगमध्ये काय आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यात अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. ती समोर आलेली नावे आधी बाहेर काढली पाहिजे. टॅपिंग कायदेशीर होतं की बेकायदेशीर होतं हा मुद्दा नंतरचा आहे. पैसे मागितल्याचं टेप झालं आहे. पण आपल्यावर आरोप होऊ नये, म्हणून रश्मी शुक्लांवर आरोप करणं सुरू आहे. ही कायद्याची चेष्टा सुरू आहे का? का मुख्यमंत्री यावर काही बोलत नाही? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.