बिहार | सध्या महिला अत्याचाऱ्यांच्या घटना संपूर्ण देशात वाढलेल्या असून चिंतेची बाब बनत चालली आहे. तीन महिन्यांपूर्वी एका तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर येथील लोक जनशक्ती पार्टीचे खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांमुळे एकाच खळबळ उडाली आहे.
तसेच ता एफआयआरमध्ये चक्क नेते चिराग पासवान यांचंही नावं नोंदवण्यात आले आहे. संशयित आरोपी आणि चुलत भाऊ प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात कारवाईला उशीर केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयानं आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती देताना, आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलांनी सांगितले की, ‘आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दिल्ली न्यायालयात याबाबत अर्ज करण्यात आला होता. यानंतर दिल्ली न्यायालयानं खासदार प्रिन्स राज आणि त्यांचा चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.
विशेष म्हणजे, 10 फेब्रुवारी 2021 रोजी प्रिन्स राज यांनी फिर्यादी तरुणीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी प्रिन्स राज म्हणाले होते की, ‘एका महिलेनं माझ्याविरोधात काही आरोप केल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मी 10 फेब्रुवारी रोजीच तक्रार दाखल केली होती. तसेच पोलिसांसमोर सर्व पुरावे सादर केले होते.’