संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने हौदोस घालायला सुरवात केली आहे, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातही कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यातच बरेलीच्या नवाबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचे आज कोरोनाने निधन झाले आहे. कोरोनामुळे निधन झालेले केसर सिंह गंगवार यूपीतील भाजपचे तिसरे आमदार ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी केसर सिंह गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला राममूर्ती मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. याआधी भाजपचे आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राममूर्ती मेडिकल कॉलेजमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना नोएडामध्ये आणण्यात आले होते. पण, त्यांचा जीव वाचू शकलेला नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेत भारतीय जनता पक्षाच्या 3 आमदारांचा मृत्यू झाला आहे. त्यात केसर सिंह यांना २४ तास आयसीयू बेड मिळाला नव्हता अशी माहित समोर येत आहे.