राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडताना दिसत नाहीत. तसेच त्यांच्या या विधानाचा शिवसैनिक सुद्धा सडेतोड उत्तर देत असतात आता मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेल्या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आमदार भास्कर जाधव यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या याच वक्तव्यांवरून भाष्य केले असून महाराष्ट्रात कोणाच्या पोटी नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले जन्माला येऊ नये, असे जाधव यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार टीका केली आहे. मी नारायण राणेंना सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुले आहेत ना खरे सांगायला गेले तर अशी मुले महाराष्ट्रामध्ये कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेल.
महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात, मतमतांतर वेगळी असू शकतात, पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचे अजिबात भान नाही. कोणाबद्दल आपण काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुले आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.