मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशा शुभेच्छा राहुल शेवाळे यांनी दिल्या आहेत.
दिल्लीचेही तख्त राखावे’ अशी इच्छा खासदार राहुल शेवाळे यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’मधील विशेष लेखातून व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आजवरचा प्रवास, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धवजींनी सांभाळलेली शिवसेना, पेललेली आव्हानं याचा धांडोळा या लेखात घेण्यात आला आहे.
कोरोना संकटात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी आणि त्याची विविध यंत्रणांनी घेतलेली दखल याविषयी भाष्य करतानाच, खासदार शेवाळे यांनी केंद्र सरकारकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यात झालेली दिरंगाई याचाही उल्लेख लेखात केला आहे.
उत्तम छायाचित्रकार असल्याने नेमका कोणता क्षण टिपयाचा आणि चांगले नेमबाज असल्याने नेमका निशाणा कुठे आणि कधी साधायचा? याचा अचूक अंदाज उद्धवजी ठाकरे यांना आहे.दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धवजी यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न साकार करावं असे या लेखात लिहिले आहे.

.