मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. मात्र वाझे आणि शिवसेना पक्षातील संबंध समोर आल्यानंतर सर्व विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट केले होते. त्या पाठोपाठ आता मनसेने सुद्धा सेनेला टोला लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कला विद्युत रोषणाई करण्याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये, यासाठी घाट घातला जात आहे. खरोखरच करायचं असेल, तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या ‘कलेक्शन’मधून करा, असा टोला लगावला आहे.
दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा, म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये, म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होते का? आणि खरोखरच करायचं आहे, तर जनतेच्या पैशातून का ? महिन्याला येण्याऱ्या “collection” मधून करा. असो शुभेच्छा असा टोला संदीप देशपांडे यांनी फेसबुकच्या माद्यमातून लगावला होता.