( मुंबई प्रतिनिधी ) “माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपती केले होते” असा दावा पाटील यांनी केला आहे. ते भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. या विधानावरून राज्यात नव्या चर्चेला सुरवात झाली होती. आता पाटील यांच्या या विधानावरून राष्ट्रवादींने भाजपाला राजधर्माची आठवण करून दिली आहे.
“अब्दूल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यात नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्यावेळी अटलजी मोदींना राजधर्म काय याचा धडा शिकवत होते,” असा टोला अल्पसंख्याक नेते आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर लगावला होता.
अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते,” अशी टिप्पणी नवाब मलिक यांनी केली होती.
पुढे सीएए कायद्यावर गृहमंत्री शहा यांनी केलेल्या विधानावर बोलताना मलिक म्हणाले की, “अमित शाह सांगतात की लसीकरणानंतर सीएए कायदा लागू केला जाईल. पण ज्या गतीने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे; ते पाहता हा कार्यक्रम आणखी ५ वर्षे पूर्ण होणार नाही. आगामी काळात पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शाह असे विधान करत आहेत.