मुंबई : पुण्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री पद झेपत नसेल तर पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. आता पाटील यांच्या या टीकेला राष्ट्र्वादीचें नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर देऊन चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत” अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती” असा टोलाही अजित पवारांनी लगावला.