राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेल्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्याने मागितलेल्या वैद्यकीय उपकरणाचा तसेच, औषधें आणि कोरोना लसीचा पुरवठा करण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे अशी टीका करत काँग्रेसने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भाजपाच्या पाच आणि त्यांच्या मित्र पक्षावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे की, ऑक्सिजन तुटवड्याच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? ससा वाला उपस्थित केला आहे.
या पोस्टरमध्ये केंद्रीय मंत्री नीती गडकरी, मंत्री प्रकाश जावडेकर. मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संयज धोत्रे या राज्यातील नेत्यांचे फोटो आहेत. यावर आता भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.