शिवसेनेचे आज मुंबईत जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेची ही सभा मास्टर ब्लास्टर असणार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची आज होणारी सभा ही आतापर्यंत झालेल्या 100 सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळात इतक्या मोठ्या सभा झाल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे अशाप्रकारच्या जाहीर सभेला संबोधित करतील.
या सभेचं व्यासपीठ आपण पाहिलं तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नाही. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचं आयोजन केलं आहे. गेल्या दोन-अडिच वर्षांपासून आमचे हजारो, लाखो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाची वाट पाहत होते. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेतली आहे.
बैठका घेतल्या आहेत पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातील, देशाचं वातावरण आणि या वातावरणावर आलेला गढूळपणा आजय्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि इथे फक्त भगव्या रंगाचं धनुष्यच आकाशात तुम्हाला दिसेल असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललं आहे. काही लोक हे राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण अडथळे निर्ण करत आहेत. काहींना पोटदुखी होत आहे. या पोटदुखीवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील असा टोला सुद्धा विरोधकांना लगावला होता.