मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. या घटनेवरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणात पोलिसांकडून राणे यांना अटकही करण्यात आली आणि काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. आपल्या जन आशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून राणे रत्नागिरी जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित केले.
राणे यांनी शुक्रवारी शिवसेने आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देताना म्हटले की, त्यांना शिवसेना पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल बरेच काही माहीत आहे आणि ते एकामागून एक भानगडी बाहेर आणणार आहेत. कोणाचेही नाव न घेता राणे म्हणाले की, भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्यास कोणी सांगितले हे मला माहीत आहे.
राणे शुक्रवारी म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत 39 वर्षे काम केले आहे, मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. मला माहित आहे की त्याच्या भावाच्या पत्नीवर कोणी अॅसिड फेकण्यास सांगितले. हा कोणत्या प्रकारचा विधी आहे? एका केंद्रीय मंत्र्याला अटक करून कोणाला काय मिळाले? मी एकामागून एक भानगडी बाहेर काढणार आहे असा इशारा राणेंनी थेट सेनेला दिला आहे.