मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपच्या याच आरोपांना आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे ‘ते’ साडेतीन कोण? शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेबाबत काल म्हटलं होतं, “भाजपचे नेते सतत सांगत आहेत ना, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल.
मला असं वाटतं पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. महाराष्ट्रात सुद्दा सरकार आहे हे लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेत्रृत्वातलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ” तुमचे धंदे बंद होतील ‘महाराष्ट्रच्या जनतेचं लक्ष माझ्या पत्रकार परिषदेकडे हवं. जनतेला माझी ही पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. केंद्रीय तपास यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनी ऐकायला हवी. शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे, तुमचे धंदे बंद होतील’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
कुठे आणि किती वाजता पत्रकार परिषद ?
शिवसेनेची ही पत्रकार परिषद शिवसेनाभवनात आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. आता शिवसेना भाजपच्या कुठल्या नेत्यांबाबत आणि काय गौप्यस्फोट करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाचा : ‘शिवजयंती उत्सव दणक्यात होऊ द्या’, मुख्यमंत्र्यांनी दिली विशेष परवानगी ‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’ शिवसेनेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत.