आज भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला होता.
आम्ही भाजपाच्या कट्टर विरोधी असणाऱ्या व्यक्तींचाही आदर करतो. भारतरत्न ते पद्म पुरस्कार ही याची उदाहरणे आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यात आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातं. त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला जातो. पण ते त्यांच्या विचारसरणीवर ठाम असतात. ते अटळ राहतात अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक करत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.
आज भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आपल्या पक्षाचे जे संस्कार आहेत, त्यांचा राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास नाही. म्हणूनच सरदार पटेल यांना समर्पित स्ट्यॅचू ऑफ युनिटी बनवण्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणूनच बाबासाहेबांसाठी पंचतीर्थ बांधण्याचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.