मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन समीर वानखेडे यांच्यानंतर आपला मोर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वळवला होता. त्यातच आज पत्रकार परिषेद घेऊन अनेक गंभीर आरोप फडणवीस यांच्यावर लगावले होते तसेच एनसीबी अधिकारी यांच्या समर्थानात उतरलेल्या मागासवर्ग्य आयोगावर सुद्धा निशाणा साधला होता. समीर वानखेडे हिंदु नसून मुस्लिम असल्याचा दावाही मलिकांनी केला होता.
मलिकांचा हा दावा खोटा ठरवत अनुसुचित जाती आयोगाकडून वानखेडेंची पाठराखण करण्यात आली होती. हा मुद्दा उचलत नवाब मलिकांनी अनुसुचित जाती आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे सांगण्याचा हक्क शेड्युल कास्ट कमिशनला नाही, असं म्हणत मलिकांनी हल्लाबोल केला आहे.
ते आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
समीर वानखेडेंना क्लिन चीट द्यायची अनुसुचित जाती आयोगाला एवढी कसली घाई झाली आहे? त्यांना एवढी आपुलकी का वाटत आहे0?, असा खोचक सवालही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्यायमंत्र्यांकडे तक्रार करत घटनाक्रमाच्या तपासाची मागणी करणार असल्याचंही मलिक म्हणाले.